तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा

गरोदर असताना  गर्भात असलेल्या बाळाला आनंदी आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही खुप काही करता परंतु त्यांचा जन्म झाल्यावर तुम्ही त्याच्यासाठी काय करता? तुमच्या बाळाला घरी सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचे घर सुरक्षित आहे का? घर बाळासाठी सुरक्षित बनवण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, काही तज्ज्ञ असेही म्हणतात की हे थोडे सुलभ करण्यासाठी घर सुरक्षित बनवण्याची प्रक्रिया बाळाच्या जन्मा आधीच सुरु करायला हवी. याची जास्त गरज तुम्हाला तुमचे बाळ रांगायला सुरुवात करते  (6-8 महिने) तेव्हा भासते, घर बाळासाठी सुरक्षित बनवण्यासाठी काय केले पाहिजे याची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे-

फर्निचर

 • फर्निचर बांधून किंवा वर करून ठेवावे, पुस्तकांचे कपाट, ड्रेसर्स आणि चढण्यासाठी किंवा पकडण्यासाठी (टीव्ही स्टँड) जे काही वापरले जाऊ शकते अशा वस्तूंना पट्ट्या मारून घ्याव्या (अँटी-टिप स्ट्रॅप्स) जेणेकरून बाळ ते अंगावर पाडून  घेणार नाही.
 • टीव्ही भिंतीवर लटकवून ठेवावा, तो टेबलवर किंवा स्टॅण्डवर ठेवू नये कारण जर  स्टॅन्ड डळमळीत असेल तर तो खाली ओढला जाऊ शकतो किंवा पडु शकतो.
 • जमिनीवरील दिवे आणि पॉट स्टॅन्ड, बाळापासून दूर ठेवले पाहिजे किंवा जड फर्निचरच्या मागे ठेवावे जेणेकरून ते खाली पडणार नाही.
 • कॉफी टेबल, नाईटस्टँड इ. सारखे कोणतेही फर्निचर, जे तुमच्या बाळाच्या उंचीचे आहे कोपऱ्यात ठेवले पाहिजे  किंवा त्यांना एज बम्पर लावले पाहिजे. तुम्ही सेफ्टी पॅडिंग देखील वापरू शकता. सर्व तीक्ष्ण कडा असलेल्या फर्निचरवर हे वापरावे.
 • बाळाच्या सुरक्षेसाठी सर्व कॅबिनेट आणि ड्रॉवरला कुलुपं आणि पट्ट्या असणे आवश्यक आहे. तुम्ही लॅच लॉक, चुंबकीय कुलुपं, ॲडजस्टेबल सेफ्टी लॉक, टेंशन रॉड्स इत्यादी वापरू शकता.

बाथरुमची सुरक्षा

 • शौचालय झाकून ठेवा किंवा बाळाच्या सुरक्षेसाठी शौचालयाच्या झाकणाला कुलुप  लावा.
 • बाळाचा हात पोहचू शकणार नाही अशा ठिकाणी रेझर ठेवा.
 • शौचालय स्वच्छ करणारी औषधे, ब्लीच आणि शौचालय धुण्याचे ब्रश बंद जागेत बाळाचा हात पोहचू शकणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
 • शॉवर आणि टबमध्ये अँटी-स्लिप मॅट्स आवश्यक आहे.
 • तुमच्या बाळाला आंघोळ घालताना पाण्याचे तापमान नेहमी तपासावे,  योग्य तापमान 37 डिग्री ते 38 डिग्री सेल्सिअस असावे. तुमच्या कोपराचा वापर करून पाण्याची चाचणी  करावी.
 • बाळाचा हात औषधांपर्यंत पोहचू शकणार नाही अशा ते ठिकाणी ठेवावे. शक्यतो बंद कुलुपात, चाइल्डप्रूफ कॅबिनेट किंवा बॉक्समध्ये ठेवावीत.
 • हेअर ड्रायर, कर्लर्स, ट्रिमर्स, इत्यादी वस्तू वापर केल्यानंतर बाळ पोहचू शकणार नाही इतक्या उंचीवर ठेवाव्या.
 • जर तुमचे बाळा आंघोळ करताना खूप हालचाल करत असेल तर नळांवर मऊ कव्हर लावणे योग्य राहील जेणेकरुन त्यावर आदळल्यास जास्त दुखापत होणार नाही.

स्वयंपाकघराची सुरक्षा

 • स्वयंपाक करताना, तुमच्या बाळाला स्वयंपाकघरातून शक्य तेवढ्या दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
 • फ्राईंग पॅन, स्किलेट्स इत्यादींचे दांडे बाहेरच्या बाजुने न ठेवता आतल्या बाजुने ठेवावे. असे केल्याने ते पकडण्याचे आकर्षण राहणार नाही.
 • ओव्हन बंद करणे आवश्यक आहे.  त्याला डोअर गार्ड देखील लावावे जेणेकरून तुमच्या बाळाला अपघाताने भाजले जाणार नाही.
 • चाकू, कात्री आणि इतर तीक्ष्ण वस्तू बाळापासून दूर ठेवल्या पाहिजे. चाइल्डप्रूफ ड्रॉवर्स किंवा कॅबिनेटमध्ये ठेवणे केव्हाही योग्य आहे.
 • स्वच्छता साहित्य, प्लास्टिकच्या पिशव्या, फॉइल इत्यादी वस्तू उंच कपाटावर  बाळ पोहचणार नाही अशा ठिकाणी ठेवल्या पाहिजे.
 • पीठ, साखर आणि इतर धान्य देखील दूर ठेवले पाहिजे. धान्य घश्यात अडकण्याचा धोका असतो, बाळानी जास्त साखर खाणे चांगले नाही आणि पिठामुळे घर घाणेरडे होते आणि त्यावरून घसरण्याचा धोका असतो.
 • क्रॉकरी आणि इतर काचेच्या पात्रांसारख्या ठिसूळ वस्तू दूर ठेवाव्यात. ते तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आहे कारण बाळकडून या वस्तू फुटून बाळदेखील त्याच्या तुकड्यामुळे जखमी होऊ शकते.

इतर मूलभूत गोष्टी

 • सर्व गालीचे आणि सतरंजी सुरक्षित आहेत याची खात्री करा आणि त्यांना अँटी स्किड रबर बेस आहेत याची खात्री करा.हे त्यांना सुरक्षित ठेवेल आणि त्यांना पडण्यापासून  वाचवेल.
 • सर्व प्लग पॉइंट्सवरील सॉकेट्स सीलबंद करणे आवश्यक आहे.
 • वायर्स आणि कॉर्ड्स व्यवस्थितपणे अशा ठिकाणी ठेवावे जिथे तुमचे बाळ पोहचू शकणार नाही.
 • जर तुमच्या घराला पायऱ्या असतील तर वरच्या आणि खालच्या बाजूस बेबी गेट करून घ्यावे जेणेकरून बाळ पायऱ्या चढ-उतर करताना घरंगळणार नाही.
 • कपाटाची नॉब, दाराची कडी इ. मोठे असतील आणि बाहेर आलेले असतील तर त्यांना कव्हर घालावे कारण त्यामुळे इजा होऊ शकते. हे मऊ कापडाचे स्वतः विणलेले किंवा शिवलेले असू शकते.
 • शक्य होईल तेवढे दार बंद ठेवा. जेव्हा तुमचे बाळ रांगायला शिकते तेव्हा ते संपूर्ण खोलीत फिरते, त्याला अडचणी येऊ शकतात, जमिनीवरील  वस्तू त्यांच्या हातात येतात.
 • नियमितपणे साफसफाई करा जेणेकरून तुमच्या बाळाला बारीकसारीक वस्तू सापडणार नाही आणि ते त्या वस्तू तोंडात घालणार नाही.
 • सर्व लटकणारे कॉर्ड्स व्यवस्थित बांधून अशाप्रकारे ठेवा की बाळाचा हात तिथे पोहचणार नाही. खिडक्यांचे कॉर्ड्स किंवा कुठल्या उपकरणांचे कॉर्ड्स असले तरी जे काही त्यांच्या हाताशी येईल अशा सर्व वस्तू ओढण्यास बाळ प्रवृत्त होऊ शकते आणि यामुळे अपघात होऊ शकतात.
 • बाळ ज्या खोलीत बहुतेक वेळ घालवत असेल अशा ठिकाणी गालिचा  किंवा रग वापरा. बाळ जेव्हा चालायला शिकते तेव्हा या गोष्टी अतिशय उपयुक्त असतात कारण बाळ खाली पडल्यास त्याला फारशी  इजा होत नाही.
 • जर तुमची खिडकी सहज उघडत असेल तर खिडक्यांना चौकटी बसवणे ही एक चांगली कल्पना असू शकते.
 • बाळाला कचऱ्याच्या डब्यापासून सुरक्षित ठेवायला डब्याला कुलुप लावा. बाळ जिज्ञासेपोटी काहीही घेऊ शकते.
 • तुम्ही घरात ठेवलेल्या वनस्पतींबद्दल जाणून घ्या. बाळाला सर्व गोष्टी तोंडात घालायला आवडतात म्हणून तुम्ही लावलेली रोपांची पानंसुद्धा यातून सुटणार नाहीत. तुम्ही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की घरातील कोणतेही झाड विषारी नाही किंवा त्याचा बाळावर कोणताही परिणाम होणार नाही.

तुम्ही स्वतः तुमचे घर आम्ही दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुमच्या बाळासाठी सुरक्षित करू शकता. बाळांसाठी सुरक्षित कुलुपं आणि इतर उपकरणे ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळू शकतात. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुमचे घर बाळासाठी सुरक्षित करण्याची सेवा देतात; तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. तुमच्या घरात बाळाची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे, म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ आहे, घर पडकं झालं आहे किंवा सामान्यत: असुरक्षित आहे, तर तुम्ही घर बदलण्याची वेळ आली आहे!